Saturday, October 12, 2024

कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Share

कोंढवा पोलीस ठाण्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याप्प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

यावेळी गुन्हा नोंद करुन घेण्यासाठी हिंदू संघटनेमार्फत आंदोलनही करण्यात आले. कोंढवा परिसरातील हिंदू संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती.या रॅलीमध्ये संभाजी महाराज यांची बदनामी व जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे. जलील यांच्याच सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘छत्रपती संभाजीनगर-जालना’ महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रूपीकरण केले होते.

सदरील घटना ही जलील यांनीच घडवून आणली असल्याचे म्हणत मंगळवारी विविध हिंदू संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यानुसार रात्री उशिरा कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला.

अन्य लेख

संबंधित लेख