Sunday, October 13, 2024

लातूरात झाला श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा भव्य मेळावा.

Share

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लालासाहेब देशमुख युवा मंच,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे मराठा समाजातील तरुणांना उद्योग करण्यासाठी महामंडळ कसे सहायक ठरते हे सांगण्यासाठी खाडगाव रोड येथील माणिकराव जाधव मंगल कार्यालय येथे 5 सप्टेंबर रोजी मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंडळांनी आत्तापर्यंत किती जणांना उद्योजक केले व मंडळाचा कशा पद्धतीने लाभ घेता येतो याची सविस्तर माहिती सांगितली. कुठलाही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायाची लाज न बाळगता छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा, मंडळ त्यांच्या पाठीमागे कायम उभे आहे असे आवाहन श्री.नरेंद्र पाटील यांनी केले.

बँकांकडून काही अडचण आली तर मी माझ्या पद्धतीने ती सोडवण्यासाठी कायम तुमच्या सोबत आहे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री.लालाजी देशमुख यांनी केले. लातूर मतदार संघातील अनेक तरुण मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. जास्तीत जास्त मराठा बांधव महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक होतील असा विश्वास सर्व उपस्थितांनी प्रकट केला.

अन्य लेख

संबंधित लेख