Wednesday, May 15, 2024

प्रतीक्षा संपली… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

Share

सातारा लोकसभा निवडणूक 2024 : भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना भाजपकडून (BJP) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीत साताऱ्याच्या (Satara Lok Sabha) जागेवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असताना उदयनराजेंनी उमेदवारीही वाट न पाहता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. आज अखेर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

सातारा लोकसभा मतदारसंघात अजित (Ajit Pawar) पवार यांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सातारा लोकसभा जागेचा तिढा सुटत न्हवता. उदयनराजे भोसले दिल्लीत जाऊन अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात होते. अखेर साताऱ्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मविआचे (MVA) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपाचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.


NB मराठीच्या WhatsApp चॅनल फॉलो करा : https://whatsapp.com/channel/0029VaWO0HLCRs1iZlueP42F

अन्य लेख

संबंधित लेख