Sunday, July 14, 2024

विधान परिषद निवडणूक: 11 जागांसाठी 12 उमेदवार | MLC Election

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी 12 जुलैला विधिमंडळात मतदान पार पडणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी आपला अर्ज भरला आहे त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित आहे. यामध्ये महायुतीचे एकूण नऊ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे, तर महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय.

पक्षनिहाय उमेदवारांची यादी

भाजप उमेदवार

 1. पंकजा मुंडे
 2. योगेश टिळेकर
 3. डॉ. परिणय फुके
 4. सदाभाऊ खोत
 5. अमित गोरखे

शिवसेना उमेदवार

 1. भावना गवळी
 2. कृपाल तुमाणे

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार

 1. राजेश विटेकर
 2. शिवाजीराव गर्जे

काँग्रेस उमेदवार

 1. प्रज्ञा सातव

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा उमेदवार

 1. जयंत पाटील (शेकाप)

शिवसेना ठाकरे गट उमेदवार
1.मिलिंद नार्वेकर

हि निवडणुक चुरशीची लढत होण्याची अपेक्षा असून, रिक्त झालेल्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडे सर्व उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे कारण त्यांचे स्वतःचे 103 आमदार आहेत आणि अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. या विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला आमदारांकडून 23 प्रथम पसंतीची मते मिळणे आवश्यक आहे.

भाजपा आणि MVA दोघांनाही त्यांच्या उमेदवारांच्या संधींबद्दल खात्री आहे. या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष दिले जाण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेतील सत्तासंतुलन निश्चित होईल आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

अन्य लेख

संबंधित लेख