Tuesday, December 3, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ: महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल सहित या नेत्यांची वर्णी

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या (Maharashtra) महत्त्वपूर्ण विकासात, राज्यातील अनेक नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारची महाराष्ट्रातील स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक फेरबदल म्हणून या हालचालीकडे पाहिले जाते.

नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हा समारंभ नवी दिल्लीतील (Delhi) राष्ट्रपती भवनात झाला, नरेंद्र मोदींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान पदाची व गोपनीयतेची शपथ (oath) दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत त्यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. या मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांबरोबरच अनेक नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांबरोबरच अनेक नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ हे एकूण ७२ सदस्यांचे जम्बो मंत्रिमंडळ आहे.

मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि पीयूष गोयल (Piyush Goyal) यांचा समावेश आहे. हे दोन्ही नेते यापूर्वीच्याही दोन्ही मंत्रिमंडळात सहभागी होते. नितीन गडकरी हे नागपुरातून, तर पियुष गोयल उत्तर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. या दोघांकडे या नव्या सरकारमध्ये कोणते मंत्रालय दिलं जातं, याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.

महाराष्ट्रातून मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा मिळालीय. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचा सहभाग ‘राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)’ म्हणून मोदी सरकारमध्ये झालाय.

महाराष्ट्रातून राज्यमंत्र्यांच्या यादीत तीन जणांना स्थान मिळाले आहे. राज्यसभा खासदार रामदास आठवले, रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.

रामदास आठवले (Ramdas Athawale) राज्यसभेचे सदस्य आणि पूर्वीच्या मोदी सरकारमधील सामाजिक न्याय राज्यमंत्री, हे एक प्रमुख दलित नेते आहेत जे भाजप आणि त्यांच्या धोरणांचे जोरदार समर्थक आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे भाजपला महाराष्ट्रातील दलित समाजात आपले स्थान बळकट होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

उत्तर महाराष्ट्रातून रावेर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार तथा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये विजयी झालेल्या रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. कोथळीच्या सरपंच ते आता थेट केंद्रातील मंत्री अशी रक्षा खडसे यांची वाटचाल राहिली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबियाचा धबधबा कायम असल्याचं याकडे पाहिलं जात आहे.

पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची लॉटरी लागली आहे खासदारकीच्या पहिल्या कार्यकाळात थेट केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं आहे. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख