Wednesday, December 4, 2024

मेळघाटातील सहा गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

Share

मेळघाटातील सहा गावांच्या नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या अभावी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. या गावांमध्ये पाणी, रस्ते आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हे गाव आहेत – रंगूबेली, धोकडा, कुंड, खामदा, डावणी आणि भोरंग. या गावांमधील १ हजार ३०० मतदारांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.

गावकऱ्यांच्या मते, वर्षानुवर्षे त्यांना वचनं दिली जातात, पण प्रत्यक्षात कोणतीच सुविधा पुरवली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि वीजेचा पुरवठा सुद्धा अत्यंत विस्कळीत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गावकऱ्यांनी आता कठोर पवित्रा घेतला आहे.

स्थानिक नेत्यांनी आणि प्रशासनाने या गावांना भेटी देऊन मतदान करण्याचे आवाहन केले खरे, पण नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी प्रथम त्यांना आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्रामुळे मेळघाटातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पडला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख