Wednesday, November 13, 2024

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक; आक्षेपार्ह पोस्ट्सवर प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक (Facebook Account Hack) झाल्याची माहिती माहिती स्वत: मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ट्विट करत दिली आहे. अज्ञात हॅकर्सने आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक केलं आहे. तसेच त्या हॅकर्सकडून आदिती तटकरे यांच्या फेसबुक अकाउंटवरुन काही आक्षेपार्ह पोस्टही करण्यात आल्या आहेत. आदिती तटकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

आदिती तटकरे ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हणाल्या कि, “नमस्कार, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व ! असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख