Monday, June 24, 2024

मनसे कडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

Share

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत X अकॉउंट वरून ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मनसेनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.”

कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यामुळे, अभिजीत पानसेंना महायुती पाठिंबा देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख