Sunday, October 13, 2024

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी

Share

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद
केल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले २ लाख २७ हजार
मोबाईल संचदेखील ब्लॉक केले आहेत. ‘संचार साथी’ च्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहिती
मिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं.

गेल्या पंधरवड्यात साडेतीन लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून ५० संस्थांना काळ्यायादीत टाकलं आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण-ट्रायच्या सहकार्यानं दूरसंचार सेवा अधिकसक्षम तसंच वेगवान गतीच्या इंटरनेटसह स्पॅम मुक्त सेवा ग्राहकांना देण्यासाठी अनेक उपाय योजनासुरू केल्या आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख