Tuesday, December 3, 2024

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली

Share

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कॉंग्रेसचे देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण व अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे.

जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. अंतापूरकर यांच्या भाजपा प्रवेशाने नांदेड जिल्ह्यात पक्षाला बळ मिळाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत आणि राज्यसभा निवडणुकीत काँगेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. यात अंतापूरकर यांच्या नावाचाही समावेश होता. यामुळे जितेश अंतापूरकर यांच्यावर पक्षाकडून जोरदार हल्लाबोल झाला होता.

अन्य लेख

संबंधित लेख