Tuesday, September 17, 2024

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार?

Share

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congrss) मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (३० ऑगस्ट २०२४) रोजी देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या जवळचे मानले जातात. जितेश अंतापूरकर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विधानपरिषद निवडणुकीत आणि राज्यसभा निवडणुकीत काँगेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. यात अंतापूरकर यांच्या नावाचाही समावेश होता. यामुळे जितेश अंतापूरकर यांच्यावर पक्षाकडून जोरदार हल्लाबोल झाला होता. अशोक चव्हाण स्वतः एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांचा वेगळा दर्जा होता पण त्यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये पक्षापासून फारकत घेतली आणि महिन्याच्या 13 तारखेला ते भाजपचा भाग बनले.

अन्य लेख

संबंधित लेख