Thursday, October 10, 2024

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

Share

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील चंद्रपूर इथल्या परिचारिका आशा बावणे यांचा समावेश आहे.

आशा बावणे यांची एकूण सेवा २८ वर्षे झाली असून ज यामध्ये २० वर्षे सेवा त्यांनी आदिवासी क्षेत्रात केली आहे. लसीकरण आणि कोविडशी संबधित सेवेसाठी त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १९७३ मध्ये राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हे पुरस्कार उल्लेखनीय काम करणाऱ्या परिचारिकांना दिला जातो.

अन्य लेख

संबंधित लेख