Saturday, September 7, 2024

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो

Share

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. यामुळे, बारामतीची निवडणूक ही शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. “मी पक्षाचा संस्थापक सदस्य असून मीच अजित पवार यांना पक्षातून काढून टाकू शकतो,” असे विधान उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत केले. उत्तम जानकर यांनी शरद पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, जानकर म्हणाले, “मला अजून पक्षातून काढून टाकलेले नाही. मी देखील दररोज विचारत आहे की, मला पक्षामधून काढले का? खरे तर मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो. कारण मी पक्षाचा संस्सथापक सदस्य आहे. शरद पवारांना अजितदादा काढून टाकत असतील, तर उत्तम जानकरांनी अजित पवारांना काढायला काय अडचण आहे?” असे उत्तम जानकर म्हणाले. 

अन्य लेख

संबंधित लेख