छत्रपती संभाजीनगर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना (Chhatrapati Shivaji maharaj statue collapse) घडली. या प्रकरणावरून महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. महाआघाडीकडून रविवारी मुंबईसह राज्यभर ‘जोडे मोरो’ आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याविरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, असं खैरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, “कोणत्याही गावात कोणताही पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा मग तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असो, त्या पुतळ्यांना वेगळ्या संदेश रूपाने काही केलं तर दंगली होतात, आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, झाल्या पाहिजेत. आज आम्ही महाविकास आघाडी मिळून जोडो मारो आंदोलन करत आहोत, पोलिस येऊ द्यात आता 40 वर्षांत आम्हाला सवय झाली आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
- शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला; गोपीचंद पडळकरांची टीका
- हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन
- …असे आहेत हे हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते..; व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- शेतकऱ्यांच्या गळ्याला वृत्तपत्रांचा फास (भाग १)
- आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी घोष यांना सीबीआय कोठडी