Tuesday, September 17, 2024

उत्तर सोलापूर मतदारसंघाने वाढवली शरद पवारांची डोकेदुखी

Share

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाला चिटकून असलेल्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वीस वर्षांपासून भाजपचे आमदार निवडून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात बदल होईल अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

सोलापूर शहर आणि जिल्हा असे एकूण ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीत मतदारसंघाच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा त्याच जागेवर दावा ठोकत शिवस्वराज्य यात्रेची सभा घेतली आहे.

उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार निवडून येण्याआधी अनेक वर्षे काँग्रेसचे आमदार होते, त्यामुळे त्या जागेवर काँग्रेसचे नेते सुद्धा दावा करत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार बाबूराव चाकोते यांचे नातू सुदीप चाकोते यांनी उत्तर सोलापूर मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. सुदीप चाकोते हे काँग्रेसच्या सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष असून राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. सोलापुरातील उत्तर सोलापूर मतदारसंघाची चर्चा राहुल गांधी यांच्या दरबारात होत आहे. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा राहुल गांधीच सोडवतील अशी अपेक्षा उत्तर सोलापूरकरांना लागली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख