Saturday, September 7, 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोफ परभणीत कडाडणार

Share

Parbhani Lok Sabha : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय प्रचाराने जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये असलेल्या लोकसभेच्या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार प्रचार केला जाणार आहे. शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Lok Sabha constituency) महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीचे कडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीकडून (MVA) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना उद्धव ठाकरे यांनी तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

20 एप्रिल रोजी परभणीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोफ कडाडणार

जानकरांच्या प्रचारार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा परभणी येथे होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू. 20 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता परभणीच्या पाथरी रोडवर हि सभा होणार आहे. या सभेला जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी महायुतीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे यांना निवडून आणण्याची सर्वस्व जबाबदारी ही भाजप आणि राष्ट्रवादीची आहे. जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या आवर्जून उपस्थित होत्या.

NB मराठीच्या WhatsApp चॅनल फॉलो करा : https://whatsapp.com/channel/0029VaWO0HLCRs1iZlueP42F

अन्य लेख

संबंधित लेख