Sunday, May 26, 2024

मुंबई जिंकण्यासाठी भाजपने तयार केला “मेगाप्लान”; पंतप्रधानांचा रोड शो, सभा होणार

Share

Lok Sabha Election : मुंबईच्या (Mumbai) सहा जागा जिंकण्यासाठी भाजपने (BJP) मेगाप्लान तयार आहे. मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसून तयार केली आहे. मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील मैदानात उतरले आहेत. मुंबई दौऱ्यात त्यांचा रोड शो देखील होणार आहे. मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ आणि १७ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 6 जागा या मुंबईत आहेत. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य यांचा मुंबईच्या सहा मतदारसंघांमध्ये समावेश आहे. सहा जागांपैकी मुंबई उत्तर, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर मध्य मधून भाजप निवडणूक लढवत असून, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य येथून शिवसेना शिंदे गट निवडणूक लढवत आहेत.

महायुतीच्या मुंबईतील सहा जागांसाठी उमेदवार रिंगणात?

  • मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
  • मुंबई उत्तर पश्चिम – रविंद्र वायकर
  • मुंबई उत्तर मध्य – उज्ज्वल निकम
  • मुंबई दक्षिण – यामिनी जाधव
  • मुंबई दक्षिण-मध्य – राहुल शेवाळे
  • मुंबई उत्तर – पीयूष गोयल

अन्य लेख

संबंधित लेख