Monday, December 2, 2024

“कांद्यावर बोला”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता

Share


नाशिक : महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse)आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ काल (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना एका शेतकऱ्याने कांद्यावर (Onion) बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली असून किरण सानप हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याने जिल्हाध्यक्ष-शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्टान व जिल्हाध्यक्ष-रा.काँ.कला व सांस्कृतिक विभाग असा परिचय लिहिला आहे.

या किरण सानप याने २३ जुलै २०२२ रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीवर एक प्रेझेंटेशन दिले होते असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवार यांनी कौतुक केले आहे. नरेंद्र मोदींना कांद्यावर बोला असे शेतकर्‍यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे असे शरद पवार म्हणाले. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे हे मला माहीत नाही. मात्र जर असेल तर त्याचा मला अभिमान आहे असेही पवारांनी आवर्जून सांगितले. स्वतःला शेतकरी म्हणवणाऱ्या या व्यक्तीचे राष्ट्रवादी पक्षाशी असलेले संबंध उघडकीस आल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख