Saturday, July 27, 2024

पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी सभा घेणार

Share

लोकसभा निवडणूक 2024 । लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी जोरदार सुरू असून सगळ्याच पक्षांकडून मोठमोठ्या सभा आणि रोड शोज घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. आता महाराष्ट्रातील (Maharashtra) ज्या लोकसभा मतदारसंघांत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे, अशा मतदारसंघांत आता लक्ष केंद्रित करण्यास सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या (MVA) प्रत्येक नेत्याकडून आपापल्या मतदारसंघांत शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. त्याचा भाग म्हणजे, पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सभा होणार आहे.

पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या पुणे (Pune) शहरासह बारामती, शिरूर, मावळ या चार लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सभा घेणार आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग अशी ओळख असलेल्या एस. पी. कॉलेज मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय आवाहन करणार याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख उमेदवार

लोकसभा मतदारसंघ महायुतीमविआ
पुणेमुरलीधर मोहोळरवींद्र धंगेकर
बारामतीसुनेत्रा पवारसुप्रिया सुळे
शिरूरशिवाजी आढळराव पाटीलअमोल कोल्हे
मावळ श्रीरंग बारणेसंजोग वाघेरे

अन्य लेख

संबंधित लेख