Saturday, September 7, 2024

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार

Share

पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार घटनावरून अब की बार गोळीबार सरकार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टिका केली.शिवाय सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गुंडागिरीच्या घटनेवरूनही सरकारला सुनावलं आहे. यावरून आता महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी “आम्ही शेतकऱ्यांवर तर गोळीबार केला नाही” म्हणत सुप्रिया सुळेंच्या वक्त्यव्याचा समाचार घेतला आहे.

माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “सुप्रियाताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. पण मी ताईंना आठवण करून देतो, जेव्हा त्यांची राज्यात आणि देशात सत्ता होती तेव्हा त्यांच्या सरकारनं शेतकऱ्यांवर गोळीबार केला, शेतकऱ्यांचा जीव घेतला. तसं तरी आम्ही काही केलेलं नाही. बोलायला गेलो तर खूप काही निघेल. परंतु, आम्ही वैयक्तिक बोलत नाही.” असे मोहोळांनी म्हटलं

अन्य लेख

संबंधित लेख