Friday, September 20, 2024

पुतळा कोसळण्यावरून राजकारण सुरू; पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता…; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

Share

मुंबई – मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हवेच्या वेगामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीने या प्रकरणावरुन राज्य सरकारला घेरले असून अनेकांनी रस्त्यावर उतरुन या दुर्घटनेचा निषेध व्यक्त के ला आहे. यावरुन माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी महाविकास आघाडीवरही (MVA) निशाणा साधला आहे.

राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला हे काही उत्तर नाही. या गोष्टींचा विचार याआधी व्हायला हवा होता. घाईगडबडीने जे असे निर्णय घेतले ते पोषक नाही. पुतळा उभारताना ज्या काही जाचक अटी असतात त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आता या घटनेनंतर राजकारण व्हायला लागलं आहे त्यात दुमत नाही. पूर्वी गडकोट किल्ल्यांवर न बोलणारे लोक आता बोलतायेत ही आनंदाची बाब आहे असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख