Wednesday, December 4, 2024

अंदमान-निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेयर चे नाव आता श्री विजयपुरम

Share

केंद्र सरकारकडून अंदमान आणि निकोबार बेटांची (Andaman and Nikobar Islands) राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे (Port Blair) नाव बदलण्यात आले असून श्री विजय पुरम असे नवे नाव ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हि घोषणा केली आहे. अमित शाह यांनी आपल्या ट्विटरद्वारे पोस्ट लिहून याची माहिती दिली. श्री विजयपुरम हे नाव ठेवण्यामागे त्यांनी कारण सांगितले आहे. ते म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंदमान आणि निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यता आणि इतिहासात बेटाला महत्त्व आहे.

या बेटाच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थीती पाहता भारतीय उपखंडात जाण्यासाठी हे बेट महत्त्वाचा मार्ग आहे. आजही भारतीय लष्कर आणि नौदलासाठी एक महत्त्वाचे धोरणात्मक केंद्र आहे. शिवाय, अलीकडे हे बेट पर्य़टनाच्या बाबतीत झपाट्याने विकासाच्या मार्गाने आगेकुच होताना दिसत असून ते देशासाठी योगदान ठरत आहे.

नौदलाची भूमिका बजावण्यासाठी हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते सेल्युलर तुरूंगात वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या भारत मातेच्या समर्पणासाठी केलेले संघर्षाचे ठिकाण म्हणून अंदमान निकोबार बेटाची ओळख आहे.

अन्य लेख

संबंधित लेख