Wednesday, January 15, 2025

भगवान बुध्दांची शिकवण देणारे आठ तत्व आजही प्ररणादायी…राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Share

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या तळवेस परिसरात उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन होते, तर विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, तसंच स्थानिक आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. हा बुद्ध विहार कर्नाटकातल्या कलबुर्गी बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे. विहारात १२०० अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र आहे. विहार परिसराच्या मुख्य प्रवेशद्वाराची रचना बिहारमधल्या सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे

त्याकरता नांदेड विमानतळावर त्यांचं आगमन झालं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरने उदगीरला रवाना झाल्या. यानंतर राष्ट्रपती आज मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान तसंच शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्या नांदेडच्या तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देतील आणि नांदेड विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण करतील.

अन्य लेख

संबंधित लेख