Friday, September 13, 2024

पुणे हिट अँड रन प्रकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना

Share

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांना फोन करून पुणे हिट अँड रन प्रकरणाच्या (Pune Hit and Run Case) आतापर्यंतच्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मिनिटं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलले. पुणे हिट एंड रन प्रकरणांमध्ये आरोपींची सखोल चौकशी करा. तसेच योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलीस आयुक्तांना थेट निर्देश आहेत.

कितीही मोठा व्यक्ती असला कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी या दबावाला बळी न पडता तपास करा. राज्य सरकार पूर्णपणे पोलीसांसोबत असून पोलिसांकडून योग्य कारवाई झाली पाहिजे. कोणाचाही हस्तक्षेप या प्रकणात खपवून घेतला जाणार नाही, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना केली आहे. तसेच जीव गेलेल्या दोन मुलांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच कोर्टात केस टिकेल अशा पद्धतीने तपास करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख