Saturday, May 25, 2024

पुणे लोकसभा : बुथ परिसरात काँग्रेस उमेदवाराचे अनधिकृत बॅनर; भाजपा नेत्याचं बुथ बाहेरच ठिय्या आंदोलन

Share

महाराष्ट्र : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान टाकलं जात आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्कही बजवायला सुरुवात केली आहे. पुण्यात लोकसभेच्या (Pune Lok Sabha) निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मतदानाच्या दिवशी भाजपाकडून (BJP) आंदोलन करण्यात येत आहे. बुथच्या ठिकाणी काँग्रेसचा (Congress) प्रचार होत असल्यामुळे पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या (Hemant Rasane) नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत.

पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात कॉंग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर अनधिकृत असून पोलीस त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजप नेते हेमंत रासने यांनी पुण्यात आंदोलन केले. बुथ ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला. बुथ परिसरात काँग्रेस उमेदवाराचे बॅनर होते. मतदान केंद्राच्या परिसरात अशा प्रकारचं बॅनर लावून मतदारांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. हेमंत रासने यांनी आंदोलन केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी बॅनर काढून घेतले.

अन्य लेख

संबंधित लेख