Tuesday, August 18, 2026

पुणे मेट्रो ३ चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते – मुख्यमंत्री

Share

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो होणार लवकरच सुरू, सप्टेंबरमध्ये पंतप्रधानांचा दौरा असण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्ली यथे झालेल्या बैठकीत त्यांचे या उद्घाटनासंदर्भात बोलणे झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यावेळी नागरी हवाई उड्डाण मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्याबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतर फडणवीसांची दिल्लीवारी चर्चेचा विषय ठरली होती. याशिवाय काल सकाळी मुख्यमंत्र्‍याच्या हस्ते पुण्यात कार्यक्रम होते ते सर्व रद्द करून फडणवीस दिल्लीला गेले होते.

शिवाजी नगर ते हिंजवडी हा मेट्रोमार्ग खूप महत्वाचा आणि प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गेले अनेक महिने ही मार्गिका पूर्ण झाली असूनही सुरू होऊ शकली नाही. स्थानिक पातळीवर यावर वादंग उठत आहेत. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळेल.

अन्य लेख

संबंधित लेख