Saturday, May 25, 2024

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच’

Share

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा झंझावाती दौरे, प्रचारसभा आणि प्रत्यक्ष भेटींचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सोलापूर, सातारा आणि पुणे (Pune) येथे प्रचार सभा पार पडल्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ मतदारसंघात निवडणूक होत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पुण्यातील रेसकोर्स मैदानात पार पडली.

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रेकॉर्डब्रेक सभा होत आहेत. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाची १४० कोटी जनता आतूर आहे. हीच गॅरंटी समोर बसलेल्या अथांग जनसागराने दिली असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यातच आहे. पुणेकर खूप हुशार आहेत. येत्या निवडणुकीत ते विरोधकांची हवा काढतील असे निक्षून सांगितले. भारताला महासत्ता करण्याचे वचन देखील मोदीजी पूर्ण करून दाखवतील,’ असं विश्वास यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बोलून दाखवला.

‘धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ या चिन्हांना मतदान म्हणजे मोदीजींना मत म्हणजेच देशाच्या विकासाला मत अशी जनमाणसांची भावना आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात महायुतीच्या चारही उमेदवारांना भव्य मताधिक्याने विजयी करावे’ असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

अन्य लेख

संबंधित लेख