Monday, June 24, 2024

अल्पवयीन मुलगा की ड्रायव्हर? कोण चालवत होत गाडी? पोलीस आयुक्तांनी केला खुलासा…

Share

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे कारची धडक (Pune Porsche Accident) बसून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वातावरण प्रचंड तापलं आहे. या प्रकरणी रोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. या प्रकरणात आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवी माहिती दिली आहे. 17 वर्षीय आरोपी आणि त्याच्या वडिलांनी अपघाताच्या वेळी आपला फॅमिली ड्रायव्हर पोर्शे कार चालवत असल्याचा दावा केला होता. कारमधील त्याच्या मित्रांनीही याला दुजोरा दिला होता. मात्र पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली या प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे. अमितेश कुमार म्हणाले की, “आम्ही घरातून बाहेर पडल्यापासून ते अपघात झाला तोपर्यंत आणि आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जाईपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा तपास केला आहे. प्रत्येक सीसीटीव्ही, प्रत्येक ठिकाणची कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. अल्पवयीन आरोपी हाच गाडी चालवत होता. घरातून निघताना पोर्शे गाडी घेऊन अल्पवयीन आरोपीच निघाला असंही रेकॉर्ड आहे, सीसीटीव्ही फुटेजही आहे.

पुढे ते म्हणाले, “ही गोष्ट खरी आहे की, अपघात झाला त्यानंतर ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला होता. ही बाब आमच्या चौकशीमध्ये समोर आली आहे. म्हणून ज्याने अशा प्रकारे पुराव्यांमध्ये छेडछाड केली. त्याच्यावर पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात येईल”, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

अन्य लेख

संबंधित लेख