Monday, October 7, 2024

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी नवीन खुलासा; अपघातावेळी मुलगा नाहीतर ड्रायव्हर कार चालवत होता; आरोपीच्या वडिलांचा दावा

Share

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : पुणे येथील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताचे (Pune Porsche Crash) रोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. पोर्शे कार या हायप्रोफाईल प्रकरणातील 17 वर्षीय आरोपी आणि त्याच्या वडिलांचा दावा आहे की अपघाताच्या वेळी आपला फॅमिली ड्रायव्हर पोर्शे कार चालवत असल्याचा दावा केला आहे. 19 मे 2024 रोजी पहाटे घडलेल्या या घटनेत मध्य प्रदेशातील दोन सॉफ्टवेअर अभियंते, अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा, दोघेही मरण पावले.

विशाल अग्रवाल याने दावा केलाय की, अपघात झाला त्यावेळी फॅमिली ड्रायव्हर कार चालवत होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन आरोपी मुलाच्या दोन मित्रांनी देखील या दाव्याचे समर्थन केलं आहे. पोलिसांनी ड्रायव्हरची चौकशी सुरु केली आहे. ड्रायव्हरने आपल्या पहिल्या जबाबात अपघातावेळी आपणच कार चालवत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे

अन्य लेख

संबंधित लेख