Monday, October 7, 2024

उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे द्या

Share

२०१९ सालचा भाजप – शिवसेना युतीला मिळालेला जनादेश पायदळी तुडवत उद्धव ठाकरे यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासमवेत हात मिळवणी करुन मुख्यमंत्रीपदी स्वत:ची नियुक्ती करवून घेतली. बाळासाहेब ठाकरे ज्या काँग्रेसविरुद्ध आयुष्यभर लढले, त्या काँग्रेसशी ठाकरे यांनी हातमिळवणी केली. बाळसाहेबांचा व्यक्तिगत आणि कौटुंबिक वारसा सांगणाऱ्या उद्धव यांनी पित्याशी केलेला हा उघड उघड द्रोह होता. उद्धव यांची ही भूमिका अनेकांना मंजूर नव्हती आणि नाही. उद्धव ठाकरे यांनी या बाबत कधीही आजपर्यंत समाधानकारक खुलासा केलेला नाही. या प्रश्नासह आजपासून आम्ही उद्धव यांना रोज काही प्रश्न विचारणार आहोत.

१) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वर्षानुवर्षे आपल्या भाषणाचा प्रारंभ ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधुंनो, भगिनींनो आणि मातांनो’ असा करीत असत. तुम्ही ही परंपरा खंडित करण्याचे कारण काय?

२) आजपर्यंत हिंदुविरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमवेत सत्तेसाठी हातमिळवणी करण्यासाठी तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केला का?

३) काँग्रेससमवेत जाण्याऐवजी मी शिवसेनाचे दुकान बंद करीन, हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रसिद्ध विधान आपणास आठवते का?

४) शिवसेना गेली तीन दशके मुंबई महानगरपालिकेतील सत्ता चालवत आहे. मुंबई ही शिवसेनेची ‘life line’ असल्याचे मानले जाते. तरी सुद्धा मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार का होत आहे?

Table of contents

अन्य लेख

संबंधित लेख