Monday, December 2, 2024

राज ठाकरेंचा “फतवा”, मशिदींमधून जर मौलवी फतवे काढत असतील तर…

Share

पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान (Voting) होत आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुण्यात महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली.

यावेळी, “जे सुज्ञ मुसलमान आहेत ते फतव्यांना जुमानत नाहीत पण काँग्रेसला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा म्हणून मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फतवे निघत आहेत. मुस्लिम समाजाला तुम्ही काय गुरं-ढोरं समजता का? त्यांना स्वतःचा विवेक नाही का ? त्यांनाही समजतंय कोण आपल्याला वापरून घेत आहेत. मशिदींमधून महाविकास आघाडीला, काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मौलवी फतवे काढत असतील तर आज हा राज ठाकरे फतवा काढतोय , “तमाम हिंदू माता-भगिनी-बांधवांनो मुरलीधर मोहोळ असतील किंवा महायुतीचे जे उमेदवार असतील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.” असं म्हणत राज ठाकरेंनी धार्मिक मुद्द्यालाही हात घातला.

अन्य लेख

संबंधित लेख