Sunday, February 16, 2025

शरद पवार हे भारतीय राजकारणातील “सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे सूत्रधार” असल्याचा आरोप

Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दावा केला की शरद पवार हे भारतीय राजकारणातील “भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार” आहेत. पुण्यातील (Pune) भाजपच्या (BJP) अधिवेशनादरम्यान हे आरोप करण्यात केले. शाह यांनी विरोधी आघाडी, महाविकास आघाडी (MVA) आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली.

शाह म्हणाले, “भारतीय राजकारणात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार कोण असेल तर ते शरद पवार आहेत. या देशात भ्रष्टाचाराचे संस्थात्मकीकरण करण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते शरद पवार आहेत. त्याबद्दल माझ्या मनात अजिबात संभ्रम नाही. ” असं ते म्हणाले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख