Saturday, July 27, 2024

पुण्यात मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा: मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरात तयारी

Share

भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. या सभेची तयारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरात सुरू आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात येत्या शुक्रवारी (१० मे) सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे महायुती अधिक बळकट झाली आहे. राज यांच्या सभेमुळे देखील

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पुण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सभेच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर, किशोर शिंदे, गणेश सातपुते, हेमंत संभूस, अजय शिंदे, योगेश खैरे, जयराज लांडगे, बाळा शेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदगावकर म्हणाले, पुणेकर मतदार विशेषतः युवक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जण काम करत आहोत. सभेला उच्चांकी गर्दी होईल असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आणि आढावा घेतला. वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न करत आहोत.

अन्य लेख

संबंधित लेख