Sunday, May 26, 2024

राम सातपुते, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share

लोकसभा निवडणूक 2024 : सोलापूर लोकसभेचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि माढा (Madha) लोकसभेचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राम सातपुते यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचे सहकुटुंब दर्शन घेतले. सोलापूरकरांच्या (Solapur) सेवेसाठी बळ देण्याची प्रार्थना यावेळी त्यांनी केली. तर, दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आज आपला अर्ज दाखल करणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून भाजपा आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. भाजपाने माढामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली होती. तेव्हापासून मोहिते पाटील नाराज होते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला. मविआ ने धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यामुळे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख