Tuesday, September 17, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे आज प्रकाशन

Share

मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज गडकरी रंगायतन सभागृह ठाणे (Thane) येथे सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ असं या पुस्तकाचे नाव आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील विविध घटना, प्रसंग या चरित्रग्रंथातून मांडण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, तसेच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख