सकाळी सकाळी बबड्या कॅल्क्युलेटर घेऊन बसला होता…
आकडेमोड करता करता मध्येच तो आपण कसली आकडेमोड करतो आहोत तेच जेन्युअनली विसरत होता…
आकडेमोड करता करता दुपार झाली…
आणि अचानक बाबा समोर येऊन उभे राहिले…
काय रे बबड्या कसल्या आकडेमोड करतो आहेस?…
काही नाही बाबा… काल त्या प्रिन्सिपॉलनी तो फोटो न काढण्याचे २०० रुपये दिले असते तर म्यॅटर तिथल्या तिथे संपला असता…
बरं मग…
त्यांनी तो फोटो परत लावला आहे… मी परत जाऊन काढला तर प्रिन्सिपल नक्की २०० रुपये देतील…
हां मग…
म्हणून मी हिशोब करतोय की महाराष्ट्रात त्यांचे असे किती फोटो लावलेले असतील… आणि प्रत्येकी २०० रुपये धरले तर सगळे मिळून किती रुपये होतील त्याचा हिशोब करतोय…
मग काय उत्तर आलं?…
बाबा कॅल्क्युलेटरवर सारखं E येतंय…
मग २०० च्या ऐवजी १०० घेऊन बघ…
बाबा तरी E च येतंय…
जाऊ दे… तू महाराष्ट्राचा नको फक्त मुंबईचा हिशोब करून बघ…
बाबा तरी E च येतंय…
तो नाद सोड… दाखवलास तो गनिमी कावा काही कमी नाही… आपण रिया अहिरच्या हस्ते तुझा शिवाजी पार्कवर सत्कार ठेवूया… त्या सोहळ्याची जय्यत तयारी कर…