Saturday, October 12, 2024

काँग्रेसचा नेहमीच आरक्षणाला विरोध; जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही

Share

काँग्रेस (Congress) पक्ष नेहमीच आरक्षणाच्या (Reservation) विरोधात राहिला आहे. जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, असं स्पष्ट मत भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलय. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. वर्षानुवर्षे येथे सत्तेवर आलेल्यांनी दहशतवाद पसरवला आणि तुमचे हक्क हिरावून घेतल्याचं ते म्हणाले.

अमित शाह म्हणाले, “राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन भारतातले आरक्षण संपवू, असे विधान केले. त्यांचा पक्ष नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिला आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, हे मला स्पष्ट करायचे आहे. लवकरच तुम्हाला तुमच्या मुलांना ट्रेन पाहण्यासाठी जम्मूला घेऊन जावे लागणार नाही. पुंछ आणि राजौरीसाठी लवकरच गाड्या येतील. तुम्ही लवकरच येथून थेट दिल्लीला येऊ शकाल.”

शाह पुढे म्हणाले की, कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. दलित, मागासवर्गीय, गुर्जर बकरवाल आणि पहाडींना आरक्षण मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. ही ऐतिहासिक निवडणूक आहे. ते म्हणाले की, मी संपूर्ण राजौरीचा मूड पाहून आलो आहे, यावेळी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा सफाया होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीवरून लोकशाहीचा विजय होणार असल्याचे दिसून येते. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांनी वर्षानुवर्षे येथील जनतेचे हक्क हिरावून घेत त्यांना लोकशाहीपासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामपंचायत, गट, जिल्हा पंचायत निवडणुका होऊ दिल्या नाहीत. तिन्ही घराण्यांनी इथे आपली हुकुमत गाजवली.

अन्य लेख

संबंधित लेख