Monday, December 2, 2024

संजय राऊत जामिनावर बाहेर असलेला आरोपी

Share

भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली आहे. वाघ यांनी राऊत यांना ‘जामिनावर बाहेर असलेला आरोपी’ म्हणून संबोधले आणि त्यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केला.

चित्र वाघ म्हणाल्या कि, “सर्वज्ञानी संजय राऊत कोण आहे? एक जामिनावर बाहेर असलेला आरोपी आहे. १०३ दिवस, दिवस एखादा दुसरा माघे होऊ शकेल, जेल मध्ये राहून आला आहे. यामुळे, त्यांचा डोक्यावर झालेला परिणाम हा तुम्हाला आम्हाला समजून घेतला पाहिजे. संजय राऊत सध्या तुम्ही रिकामे आहेत. काही कामे नाहीत, धंदा नाही” असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लागावला.

पुढे त्या म्हणाल्या, “त्या उद्धवजी बिचाऱ्यांना हे आमचे मुख्यमंत्र्यांचा चेहरा आहेत म्हणून प्रसिद्ध करत नाहीत. पवार साहेबांना आणि काँग्रेसवाल्यांना अरे मुख्यमंत्रीच चेहरा प्रसिद्ध करा सांगता सांगता तुमच्या तोंडाला फेस आला. तुम्ही रिकामे आहेत, माझा सल्ला आहे तुम्हाला, तुम्ही स्वतः जा बावनकुळे साहेबांचे कान साफ करायला जा, त्याच्याने काय होईल ते तुमचे कान नीट टोचतील. मी तर जातिवंत सोनार आहे, आमच्याकडे असे म्हणतात कान टोचले कि अक्कल जागेवर येते. त्याच्यामुळे इकडेतिकडे कुठे भरकटलेली अक्कल असेल ती सुद्धा जागेवरती येईल. त्यामुळे, स्वतः तिकडे बावनकुळे साहेबबाकडे जावे आणि त्यांचा कान साफ करावा आणि त्यांच्याकडून कान टोचून घ्यावे,” असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख