Wednesday, November 27, 2024

संजय राऊत ‘या’ प्रकरणात दोषी; १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड

Share

मुंबई : उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात माझगाव सेशन्स कोर्टाने हा निकाल दिला आहे.

संजय राऊतांनी कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवलं आहे. संजय राऊत यांनी सोमय्या दांपत्याने शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा केल्याचा बेछुट आरोप केलेला. हा घोटाळा 100 कोटींचा असून या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी संजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख