Saturday, October 12, 2024

संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम

Share

ठाणे : बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. “बदलापूरची शाळा ही श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात आहे, असा आरोप त्यांनी केला. पण ती शाळा कुठे आहे याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांनी घ्यावी. ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघात बदलापूर येथे आहे. बदलापूर हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. संजय राऊत राजकारणात अनपढ आहेत. कुठलीही माहिती न घेतला ते केवळ आरडाओरड करतात. ते नोकरी उबाठाची करतात आणि चाकरी शरद पवारांची करतात,” असे नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, “भिवंडीमध्ये शरद पवार गटाचा खासदार आहे. त्याची पाठराखण करण्यासाठी राऊत असं वक्तव्य करतात. केवळ खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे. काही गोष्टी माहिती घेऊन बोलायच्या असतात. केवळ प्रसिद्धीमाध्यमांचे माईक चेहऱ्यासमोर आल्यावर तोंडात येईल ते बोलायचं, ही त्यांची पद्धत आह,” असा टोला त्यांनी लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख