Saturday, May 25, 2024

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान

Share

Amravati Lok Sabha : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्‍याविषयी बोलताना बेताल वक्तव्य केला आहे. नवनीत राणा यांच्‍याविषयी बोलताना संजय राऊत यांची अक्षरशः जीभ घसरली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघामध्‍ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची लढाई ही एका ‘नाची’सोबत आसल्याच वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं असून भाजप (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊतांवर तोफ डागली आहे.

‘सर्वज्ञानी संजय राऊत…स्त्रीचा सन्मान करणं हा खरा महाराष्ट्रधर्म आहे. पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीत बसून हिंदुत्वद्वेषी झालात, हिंदुत्वद्रोही झालात, तसेच नवनीत राणांसारख्या एका स्त्रीचा अपमान करून महाराष्ट्रधर्मद्रोही झाल्याचाही पुरावा तुम्ही दिलात. त्यांना नाची म्हणून तुम्ही एका मराठी स्त्रीचा अपमान केलात.’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

स्वतः काँग्रेसच्या फडावर तुणतुणं घेऊन मर्कटनृत्य करणाऱ्याच्या तोंडी अशी विकृत भाषा येणारच. कारण, तुमचा मेंदू सडलेला आहे. स्वर्गीय बाळासाहेब राजकारण्यातल्या, देशातल्या, राज्यातील महिलांचा सन्मान करायचे. तुम्ही बाईच्या पदरावर राजकारण करणारे सडक्या मेंदूचे सर्वज्ञानी आहात. तुमच्या आजच्या ताळतंत्र सोडलेल्या भाषणाचा मनमुराद आनंद ज्या नेहमी ज्ञान देत असतात अश्या काँग्रेसच्या (Congress) यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांनी सुद्धा लुटला. आणि त्यावरून काँग्रेसची महिलांबद्दल असलेली काय मानसिकता आहे हे सम्पूर्ण महाराष्ट्राने पहिले. असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर सुद्धा टीका केली.

सभ्यतेचे सगळे संकेत पायदळी तुडवून सर्वज्ञानी महिलांचा अपमान करणाऱ्या तुमच्यासारख्या शब्दपिसाटांनी केलाय. तुम्हाला महाराष्ट्राची जनता नाचवल्याशिवाय राहणार नाही. पुढे त्या म्हणाल्या “विश्वासाने सांगते येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या सारख्या शब्दपिसाटाला या देशातील मातृशक्ती थोबाडात दिल्याशिवाय राहणार नाही हे लिहून ” घ्या म्हणत त्यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख