Monday, June 24, 2024

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना “ती” पोस्ट भोवली; गुन्हा दाखल

Share

हिंगोली : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याची सोशल मीडिया पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Poul) यांनी केली होती. या प्रकरणात अयोध्या पोळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार बांगर यांच्या घराबाहेर 27 मे रोजी रोजी एका व्यक्तीने शिवीगाळ करत गोळीबार केल्याचे द्वीट उद्धव ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी केले होते. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता ही अफवा असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी अयोध्या पोळं यांच्या विरोधात हिंगोली पोलिसांनी खोटी अफवा पसरून जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, “विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार परवा संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शिवीगाळ अन नंतर फायरिंग झाली होती म्हणे? सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं सांगतील का?” असे अयोध्या पौळ यांनी केलेल्या द्विटमध्ये म्हटले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख