Saturday, September 7, 2024

पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती

Share

पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम छोट्या छोट्या उपक्रमांमधून देखील चांगल्या पद्धतीने करता येते. पंढपूरमधील वरद आणि सृष्टी बडवे हे बहीण-भाऊ असे काम कशा पद्धतीने करतात, त्याची ही ओळख, २२ एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने.

पर्यावरणाचे काम करणारे वरद बडवे आणि सृष्टी बडवे हे गेली काही वर्षे पशुपक्ष्यांना पाणी ठेवणे, चारा ठेवणे अशा स्वरूपाचे काम करतात. पंढरपूरमध्ये त्यांचे हे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. त्यांच्या यू ट्यूब चॅनल मार्फतही ते याबाबत जनजागृती करत असतात. मध्यंतरी वरद कॉलेजच्या परीक्षेसाठी गेला होता. त्याला उन्हात थोडा त्रास झाला. आपल्याला उन्हाचा त्रास होतो, तर पशुपक्ष्यांना किती होत असेल याची जाणीव वरदला झाली. तसेच गल्लीतील एक, दोन चिमण्या उन्हामुळे मरून पडल्या. त्यामुळे पक्ष्यांना वाचवण्याचे या दोघा बहीण-भावांनी ठरवले.

आपण या विषयाची जनजागृती करणारे फलक सर्वत्र लावू या आणि पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे ठेवण्याचे आवाहन करू या, असे त्यांनी ठरवले. सर्वांना एक विनंती करू या की पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, असेही ठरले. त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन व मातीच्या भांड्याचे पूजन पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक श्री. घोडके आणि ह. भ. प. रामकृष्ण वीर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. श्रींचे पूजन करण्यात आले आणि पर्यावरण जनजागृतीचा फलक तसेच मातीचे भांडे मान्यवरांना देण्यात आले. श्री. घोडके यांनीही शहर पोलीस स्टेशन येथे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे ठेवू, असे आश्वासन दिले. तसेच वरद आणि सृष्टी पर्यावरणाचे जे काम करत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांना आशीर्वादही दिला. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण जनजागृतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती वरद आणि सृष्टी यांनी केली.

Shrusti and varad badave

जनजागृती करणारे फलक
यो दोघांनी जे फलक तयार केले आहेत, त्यावर जल है तो कल है, एक पेड, देश के नाम, थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग सुखी भविष्याचा, आपल्या नद्या मंदिरे गडकोट, स्वच्छ व पवित्र ठेवूया, झाडे लावा, झाडे जगवा, चला जल जमीन ऊर्जा पेड जीव यांचे संरक्षण करू या, आपला परिसर स्वच्छ ठेवा, निरोग रहा, अशा प्रकारच्या घोषणा आहेत. असे जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख