Wednesday, December 4, 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

Share

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी महायुती सरकारचा अर्थ संकल्प अर्थसंकल्प मांडला या मध्ये मुख्यमंत्री अन्न पूर्णा योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (एमएवाय) ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे.

या योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दरवर्षी तीन घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर मोफत प्रदान केले जाणार आहेत. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करणे हा या योजनेचा हेतू आहे. हे गॅस सिलेंडर अगदी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत म्हणजेच वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट बँक खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार कुटुंबांना फायदा होणार आहे

या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे निकष :-

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही सर्वांसाठी लागू असणार नाही

1) लाभार्थ्याकडे पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.

2) अनुसूचित जाती ,जमाती ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे

3) लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावे

4) लाभार्थी कुटुंबाचे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे

1)महाराष्ट्राचे रहिवासी पुरावा

2)आधार कार्ड

3)रेशन कार्ड

4)मोबाइल नंबर

5)पासपोर्ट आकाराचा फोटो

6)गॅस पासबुकची प्रत

प्रत्येक घराला एलपीजी गॅस सिलेंडर परवडायला हवा म्हणून प्रत्येक पात्र कुटुंबाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे सध्या तरी या योजनेचा जीआर म्हणजे शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

अन्य लेख

संबंधित लेख