Saturday, March 15, 2025

जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम शरद पवारांनी केलंय

Share

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने ९ जागेवर विजय मिळवला. दरम्यान, महाविकास आघाडीची मतं फुटली नसती तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले नसते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला नसता. पराभव झाल्यानंतर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, आता जयंत पाटील यांच्या पराभवानंतर विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले कि, “जयंत पाटील हे शेकाप वरिष्ठ नेते आहेत शेतकरी आणि कामगारांच्या चाळवळी महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभ्या केल्या. जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवारांनी केलंय”

सदाभाऊ खोत म्हणाले कि, महाविकास आघाडीचे सर्वेसर्वे शरद पवार आहेत. ते म्हणतात, महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन ते करू शकतात. कोणाचीही सत्ता आणू शकतो. कोणाचीही सत्ता घालवू शकतो. उद्धव ठाकरेंना सोबत कोणी घेतलं? काँग्रेसला बरोबर घेऊन, शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं. तेव्हा शरद पवारांनी फोडाफोडी केली. स्वत:कडे सत्ता येत असेल तर वाटेल ते करण्याची पवारांची तयारी असते. या राज्यातील शेकाप संपवण्याचं काम खऱ्या अर्थाने शरद पवारांनी केलं. मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात. भाजपची साथ सोडताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात, मग जयंत पाटलांच्या साध्या उमेदवारीसाठी त्यांनी का ऐकलं नाही. हा पवारांनी टाकलेला डाव होता. या डावामध्ये जयंत पाटलांचा बळी गेला, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.

अन्य लेख

संबंधित लेख