शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती, तसेच इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आता आज (२८ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ७ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये माण मतदारसंघासाठी प्रभाकर घार्गे, काटोल-सलील अनिल देशमुख, खानापूर-वैभव पाटील, वाई-अरुणादेवी पिसाळ, दौंड-रमेश थोरात, पुसद- शरद मेंद, सिंदखेडा-संदीप बेडसे यांच्या नावाचा समावेश आहे.