Friday, March 28, 2025

हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – श्री गोविंददेव गिरी

Share


हिंदू धर्म सर्वांबाबत समभाव मानणारा आहे. कोणालाही कमी लेखणारा, भेदभाव करणारा नाही. आजच्या परिस्थितीत मात्र हिंदू समाजाला एकत्र आणणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेव गिरी यांनी केले

विश्व हिंदू परिषदेच्या पुणे महानगर विभागातर्फे स. प. महावि‌द्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित संत संगम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या वेळी विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र राज्याचे धार्मिक विभाग प्रमुख संजय मुद्राळे, अंते हर्षवर्धन शाक्य, जानी अमरजीत सिंह, चिदंबरेश्वर साखरे महाराज, १००८ किन्नर आखाडा महामंडलेश्वर दीपा नंदगिरी, जगावली माताजी, श्री महानुभव पंथाचे रविराज दादा पंजाबी, सिंधी संप्रदायाचे संत अनंत प्रकाशजी, वाल्मीकी संप्रदायाचे भागवानजी महाराज, आदिनाथ पंथ जुना दशनामी आखाड्याचे श्री कैलास नाथजी महाराज फुरसुंगीकर व पळसे महाराज उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख