Wednesday, December 4, 2024

२० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी विवेकपूर्ण मतदानाचे स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे आवाहन

Share

तारकेश्वर गड: ४ नोव्हेंबर रोजी संत नारायणबाबा सदन अनावरण अनावरण सोहळ्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) तारकेश्वर गड (Tarkeswar Gad) येथे उपस्थित होते. या प्रसंगी, सदनाचे अनावरण स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. सोहळ्यात प.पू. गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुन्हेकर, प.पू. महंत भास्करगिरीजी महाराज (देवगड), ज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर, महंत प.पू. आदिनाथबाबा (तारकेश्वरगड), तसेच श्री. विष्णुपंत गायकवाड पाथर्डी आणि विविध धार्मिक समुदायांचे महंत, साधू, संत, आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कलियुगातील रामरूप छत्रपती शिवाजी महाराज

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, “आपली खरी दिवाळी यंदाचं झाली आहे. रामललाच्या आगमनामुळे यंदा दोन दिवाळी साजऱ्या होत आहेत. पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामललाचं आगमन झाल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. कदाचित, काही जण विचारतील की या शिवचैतन्य जागरण यात्रेचे (Shiv Chaitanya Jagran Yatra) प्रयोजन काय? निवडणुका जवळ असल्यामुळे ही यात्रा चालू आहे का? पण हे समजून घ्या की मी ही यात्रा गुढीपाडव्याला, गेल्या चैत्र महिन्यातच सुरू केली आहे. ज्या प्रकारे श्रीमद्भागवत, रामकथा, महाभारत, शिवपुराण, देवी भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी यांची सांगता धार्मिक व्यासपीठावर होते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्रही व्यासपीठावरून सांगितले पाहिजे. शिवप्रभूंच्या अभ्यासादरम्यान मला स्वतःला जाणवले की इतिहासात त्यांच्यासारखे महान चरित्र अन्यत्र कुठेही सापडत नाही. कधी-कधी मला वाटते, जणू त्रेतायुगातील भगवान रामांची कलियुगातील आवृत्ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.”

“अधर्माच्या नाशासाठी श्रीरामांचा कोदंड, श्रीकृष्णांचा सुदर्शन आणि शिवरायांची भवानी!”

अधर्माचा नाश केल्याशिवाय धर्माला विजय मिळवता येत नाही. म्हणूनच अधर्माचा पराभव करण्यासाठी भगवान श्रीरामांनी कोदंड हाती घेतला, भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शनचक्र धारण केले, आणि याच अधर्माचा नाश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार उचलावी लागली. याशिवाय प्रजेचे रक्षण करणे शक्य नव्हते. त्यांनी जे महान कार्य केले ते केवळ भोसले घराण्यासाठी, मराठा समाजासाठी किंवा २-३ जिल्ह्यांसाठी नव्हते; ते हिंदू समाजाच्या रक्षणासाठी एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे कार्य होते, असे त्यांनी सांगितले.

२० नोव्हेंबरला विवेकपूर्वक मतदान करा

“स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकला आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपलं कर्तव्य काय असावं, यावर मार्गदर्शन केलं. शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांद्वारे राष्ट्रकार्याची प्रेरणा त्यांनी उपस्थितांना दिली. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत विवेकपूर्वक मतदान करण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं, तसेच आपल्या परिचितांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याचं आवाहन केलं. “जो राम जी को लाए हैं, हम उनको लाएंगे,” असं म्हणत त्यांनी विशिष्ट उमेदवारांना निवडून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.”

अन्य लेख

संबंधित लेख