Saturday, July 27, 2024

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Share

मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Teachers and Graduates Election) जाहीर झाली आहे. येत्या १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दोन पदवीधर तर दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभा निवडणूकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून त्यानंतर लगेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.

१० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे :

  • १५ मे > उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार
  • २२ मे > उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
  • २४ मे > उमेदवारी अर्जाची छाननी
  • २७ मे > उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
  • १० जून – विधान परिषद निवडणूक मतदान
  • १३ जून – विधान परिषद निवडणूक मतमोजणी

अन्य लेख

संबंधित लेख