राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे.राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत असल्याचं, महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.